IPL Betting
IPL Betting Sarkarnama
पुणे

IPL Cricket Betting News : 'आयपीएल' क्रिकेट मॅचवर 'बेटिंग' घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : सध्या 'आयपीएल' क्रिकेटचे सामने सुरू आहेत. या क्रिकेट मॅचवर चंदननगर परिसरात 'ऑनलाइन बेटिंग' घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पुणे पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (ता. २४) रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगड, पंजाब आणि बिहार राज्यातील सहा बुकींना खराडी परिसरात अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गौरव दयाराम धरमवाणी (वय २७), सुनिश तुलशीदास लखवानी (वय २५), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा (वय २५, रा. खराडी, मूळ रा. रायपूर, छत्तीसगड), जसप्रीत मनजिंदरसिंग सिंह (वय २९), तरणदीप बलजिंदर सिंह (वय ३३, दोघे रा. शिवाजीनगर, लुधियाना, पंजाब) आणि लालकिशोर दुखी राम (वय ३७, मूळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार) यांना अटक केली आहे. तर, डीके नावाचा बुकी फरार आहे. आरोपींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील सदनिकेत क्रिकेट मॅचवर बेटिंग सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी खराडी येथील सोसायटीमधील एका सदनिकेत छापा टाकला. त्यावेळी आरोपी मुंबई इंडियन्सविरुध्द लखनौ सुपर जायंट्स या क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळले.

आरोपींकडून १६ मोबाईल हॅन्डसेट, दोन लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींच्या बँक खात्यातील सुमारे २० लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जाधव यांनी दिली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलिस अंमलदार संदीप कोळगे, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT