BJP Symbol Lotus Sarkarnama
पुणे

Bjp News : कसबा मतदारसंघ खरंच भाजपचा बालेकिल्ला आहे का ?

Kasba By Election : ...तर धंगेकरांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो!

सरकारनामा ब्यूरो

महेश जगताप

Pune Political News : कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत कसबा मतदारसंघानं कायमच भाजपच्या पारड्यात इतर प्रमुख राजकीय पक्षांच्या तुलनेत झुकतं माप दिलं आहे. सध्याचे पुण्याचे खासदार यांनी तर गिरीश बापट यांनी तर सलग पाच वेळा मतदार संघ भाजपला आजपर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवता आला आहे. पण कसबा मतदारसंघ खरंच भाजपचा बालेकिल्ला आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी आकडेसमोर आली आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत गिरीश बापट (Girish Bapat)हे खासदार झाले. यानंतर बापटांच्या जागी पुण्याच्या तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी विजयही मिळविला.त्यांच्या निधनानंतर आता कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्यात याठिकाणी लढत होत आहे. यानिमित्ताने कसबा कोण जिंकणार यावरुनन राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करतानाच हा आमचाच बालेकिल्ला असल्याचा दावाही केला जात आहे.

पण कसबा मतदार संघाचा आढावा घेतला तर हा बिलकुल भाजपचा बालेकिल्ला नाही .तुम्ही जर गेल्या चार निवडणुकीचे विश्लेषण करून अभ्यास केला तर लक्षात येईल की, काँग्रेस ,राष्ट्रवादी , उमेदवारांच्या मतांची बेरीज ही भाजपच्या उमेदवाराच्या मिळालेल्या मतापेक्षा तीस ते चाळीस टक्के अधिक आहे .भाजपचे या मतदारसंघात फोडा आणि राज्य करा हे यशाचं सूत्र राहिलं आहे.

महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे . या निवडणुकीची खरी चुरसच धंगेकर यांच्या उमेदवारीमध्ये आहे. अगदी तळागाळातील लोकांबरोबर काम केलला सामान्य कार्यकर्ता ,लोकांच्या हाकेला रात्री ,बेरात्री धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची आहे तर दुसरीकडे चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेले ,एक सामान्य कार्यकर्ता ते आमदारकीची उमेदवारीपर्यंतचा स्वकर्तृत्वावर प्रवास अशी ओळख असणाऱ्या हेमंत रासने यांची ओळख आहे.

रासने यांच्या जमेच्या बाजू ....

भाजपचे उमेदवार रासने यांचा दांडगा जनसंपर्क, विशेषतः प्रभाग १५ ,१६ ( जुनी रचना ) मध्ये रासने यांना मानणारा मोठा वर्ग आहे . नगरसेवक पदाची चौथी टर्म त्यांनी पूर्ण केली आहे. या माध्यमातून त्यांचा परिचित चेहरा म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या माध्यमातून अनेक वर्षे काम करीत असल्याने याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे. स्थायी समितीचे चारवेळा अध्यक्ष म्हणून शहरभर असलेली ओळख आहे. मध्यवर्ती भागात विकास कामाचा अधिक भर व विविध योजना राबवल्याने विकासाचा चेहरा म्हणूनही रासने यांची ओळख आहे . त्याचबरोबर कासार समाजाची साथ या जमेच्या बाजू आहेत.

...तर धंगेकर विजयी होऊ शकतात!

काँग्रेसच्या रोहित टिळक ,कमलताई व्यवहारे ,अण्णा थोरात ,सूर्यकांत आंदेकर यांनी एकत्रितपणे ताकद उभी केली तर धंगेकर विजयी मिळण्याची शक्यता आहे. कारण हे नेते एकत्र न आल्यानेच आजपर्यत भाजपच्या उमेदवाराचा विजय होत आला आहे .यांच्या मतांची बेरीज काढली तर आपणाला ते लक्षात येईल.

तसेच स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदारसंघात लक्ष घालत राष्ट्रवादी ,काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्ते कार्यरत करणं, मतदारसंघातील कामगार ,बहुजन समाज काँग्रेस ,राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. तरुण मतदाराला आकर्षित करण्याबरोबरच भाजपमधील नाराज गटाला आपल्या गटाला खेचून आणणे ही स्रव समीकरणं जर जुळुन आली तर धंगेकरांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

गेल्या चार निवडणुकीतील मतांची आकडेवारी:

2019....

भाजप : मुक्ता टिळक ७५,४९२

INC अरविंद शिंदे ४७,२९६

स्वतंत्र विशाल धनवडे १३,९८९

मनसे अजय शिंदे ८,२८४

2014

भाजप - गिरीश बापट ७३,५९३

काँग्रेस रोहित टिळक ३१,३२२

मनसे रवींद्र धंगेकर २५,९९८

राष्ट्रवादी दीपक मानकर १५,८६५

स्वतंत्र सूर्यकांत आंदेकर १०,०००

एसएचएस प्रशांत बधे ९,२०३

2009

भाजप गिरीश बापट ५४,९८२

मनसे रवींद्र धंगेकर ४६,८२०

INC रोहित टिळक ४६,७२८

बसपा सतीश मोहोळ १,३९६

एसपी अनिस अहमद १, ११०

ABHM मिलिंद एकबोटे १,०२७

2004

भाजप गिरीश बापट ३८,१६०

राष्ट्रवादी अण्णा थोरात २८,५४२

ABHM हिमानी सावरकर १,१५८

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT