Pune 23 Jan 2025: जळगावजवळ प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याने बाजुच्या ट्रॅकवरुन आलेल्या एक्स्प्रेसनं चिरडून १३ जणांचा जागी मृत्यू झाल्याची भीषण घटना बुधवारी घडली आहे. रेल्वेमध्ये अफवा पसरल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेस कोण जबाबदार आहे याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे.
अजित पवार म्हणाले, "रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावस वरून तसंच मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करून आपल्या संवेदना व्यक्त केले आहेत. सरकारमधली मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी कारवाईला सुरुवात केली.
ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून याची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की उदलकुमार हा तीस वर्षाचा भिंगा, उत्तर प्रदेश इथे राहणारा तरुण पुष्पक एक्सप्रेसने पहिल्यांदाच कामाच्या शोधासाठी मुंबई येथे जात होता. त्यांच्यासोबत त्याच्या पत्नीचे भाऊ विजयकुमार हा देखील होता. हे सर्वसाधारण विभागाच्या डब्यातून प्रवास करत असताना चहा विक्रेत्यांनी आग लागली अशी ओरड केली.यामुळे रेल्वेमध्ये एकच गोंधळ उडाला.
काही प्रवाशांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या मात्र सर्वच प्रवासी गाडीचा वेग जास्त असल्याने उतरू शकत नव्हते त्यामुळे कोणी एकाने डोकं चालून रेल्वेचे चैन ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली त्यानंतर प्रवासी जिथून जागा मिळेल तिथून रेल्वेतून खाली उतरले त्यावेळी बाजूच्याच रुळावरून बेंगलोर दिल्ली एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि प्रवाशांना धडका देऊन पुढे जाऊन थांबली. यामध्ये बरेचसे प्रवासी हे मृत्युमुखी पडले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत.
उथलकुमार आणि विजयकुमार यांना देखील रेल्वेची धडक बसली असून ते जखमी आहेत. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 13 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातील दहा जणांची ओळख पटली आहे तर तीन मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून हे फक्त अफवांमुळे घडले आहे. या दोघांमुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.