Jayant Patil on Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Jayant Patil on Raj Thackeray : 'राज ठाकरे रागात येऊन बोलत असतील, त्यापेक्षा त्यांना..' ; जयंत पाटलांनी लगावला टोला!

Jayant Patil News : '...तेव्हा मी काय गृहमंत्री होतो का?' असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे, जाणून घ्या नेमकं कशाबद्दल असं बोलले आहेत?

Sudesh Mitkar

NCP Jayant Patil on Parambir Singh : 'मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राजकारण करत आहेत.' असा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये असा इशारा देखील दिला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जरांगे स्वतंत्र विचाराने काम करणारे आहेत. ते कोणाचा सल्ला काही घेत नाहीत. राज ठाकरे(Raj Thackeray) रागात येऊन काही बोलत असतील. त्यापेक्षा त्यांना जास्त गांभिर्याने घेण्याची गरज नाही.' असं जयंत पाटील यांनी म्हणत टोला लगावला.

नाशिक येथून ईव्ही गाड्यांच्या बॅटरी बनवण्याचा कारखाना गुजरात येथे स्थलांतरित होत आहे याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असतील तर, मला वाटत नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तो थांबवू शकतील किंवा प्रकल्प गुजरातला जायला विरोध करतील.

गुजरातला जर काही जाणार असेल तर हे सरकार अडवू शकणार नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प याआधी देखील गुजरातला गेले. ते जात असताना थांबवण्याविषयी या सरकारने आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काही केले नाही.'

याशिवाय परमबीरसिंग यांनी जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावरती आरोप करत फडणवीस यांना अटक करण्यासाठी जयंत पाटील यांनी आपल्याला बोलावलं असल्याचं सांगितलं होतं. त्यावरती बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'परमबीर यांना मी कसा सांगेल? ते काय बोलतात, काय म्हणतात, कशाबद्दल बोलतात या विषयी मला काहीही माहीती नाही.⁠ मी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी ⁠परमबीर यांनाा सांगायला माझा काय संबंध येतो? मी काय गृहमंत्री होतो का काय?, परमबीरची माझी फार कमी वेळा भेट झालीय. मी कशासाठी त्यांना सांगू? असा जयंत पाटील यांनी खुलासा केला.

परमबीरसिंग(Parambir Singh) यांनी पक्षाकडून देखील वसुलीचे टार्गेट देण्यात येत होतं असा आरोप केला होता त्यावरती बोलताना जयंत पाटील म्हणाले ⁠, 'हे पूर्ण धातांत खोटे आहे. पार्टी कधी कोणाला काही सांगत नव्हती आणि कधी कोणाला काही टार्गेट देत नव्हती.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT