Pune Road accident : पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या या अपघातात आठ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
रस्त्यानजीक असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर हा अपघात झाला आहे. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावरून हा अपघात किती भयानक होता याचा अंदाज येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कार आणि पीक टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेजुरीजवळील किर्लोस्कर कंपनीसमोर श्रीराम हॉटेल येथे एका पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचं काम सुरु होतं. यावेळी जेजुरीहून इंदापूरकडे निळालेल्या स्विफ्ट कारने टेम्पोला जोरदार धडक दिली.
या धडकेत टेम्पोतील साहित्य उतरवणाऱ्या हॉटेल मालक आणि कारमधील प्रवाशांसह 8 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवली आहेत.
तर अपघात नेमका कसा झाला याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.