Ajit Pawar Sarkarnama
पुणे

जुन्नर बिबट सफारी : डीपीआरच्या निधीसाठी अजितदादांचा थेट कलेक्टरला फोन!

तेथूनच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ‘नावीन्यपूर्ण योजने’तून येत्या सोमवारी दीड कोटी रुपयांचा निधी देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

जुन्नर : परवा आमदार अतुल बेनके (Atul Benke) आणि वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट सफारीसाठी जागा निश्चित केली आहे. मलासुद्धा आज ती दाखवण्यात आली. ती चांगली जागा आहे. त्याचा डीपीआरसाठी तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये लागणार होते. तेथूनच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ‘नावीन्यपूर्ण योजने’तून येत्या सोमवारी दीड कोटी रुपयांचा निधी देण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली. (Junnar Bibat Safari : Ajit Pawar calls Collector directly for DPR funds)

जुन्नर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२ एप्रिल) करण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले की, काहीजण कारण नसताना राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. मधल्या काळात अजित पवारांनी बिबट सफारी प्रकल्प पळवून नेला आहे. असा आरोप करण्यात आला. अरे काय पळवून नेला. कोणी पळवून नेला. लोकांमध्ये कशासाठी गैरसमज निर्माण करता. तुम्ही मला विचार ना. ‘कुठल्या पक्षाचा, जातीचा आहे’ हे मी कधीही पाहत नाही. ताे लोकप्रतिनिधी आहे की, त्याने आणलेले काम जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे का. सार्वजनिक काम आहे का. ती खऱ्या अर्थाने गरज आहे का, हे सर्व मी बघतो आणि मदत करतो, हा माझा स्वभाव आहे.

बिबट सफारी बारामती पळवून नेली, असा आरोप करण्यात आला. पण, त्याला काय कारण आहे. जे ज्याला दिले आहे, ते त्यांनाच चांगल्या पद्धतीने कसे होईल, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. वन्यपशुसाठी जुन्नरमध्ये चांगला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. त्याचे उदघाटन करण्यात आले आहे. माणिकडोह येथे बिबट्यांना ठेवण्यासाठी जागा कमी पडते आहे, त्यासाठी त्यांना अधिकची जागा देऊ, त्यासाठी लागेल ती मदत देण्यात येईल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मदत घेऊन जागा मिळवून देऊ, त्यासाठी आर्थिक मदतही देण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अष्टविनायकच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात भाविक येत असतात. त्या भाविकांना बिबट सफारी करता यावी, असाही आमचा प्रयत्न आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसृष्टी प्रकल्पाचा प्रस्ताव दिला आहे. ही सगळी कामे होणार आहेत, त्यामुळे जुन्नरकरांनी काहीही काळजी करू नये, असा शब्दही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT