Kasba By-Election : Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : धीरज घाटेंच्या मांडीवर बसून चंद्रकांतदादांचा प्रवास अन् बावनकुळेंनी दिले 'हे' आश्‍वासन !

Chandrakanta Patil : "धीरज योग्यवेळी तुला मांडीवर घेऊ..."

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : कसबा पोटनिवडणुकीत आता भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाकडून उमेदवान निश्चित झाले आहे. भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहेत. उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता कसबामध्ये प्रचाराला खरी रंगत आली आहे. प्रचाराची स्पर्धाच जुगलबंदी दिसून आली. दोन्ही पक्षांचे राज्यस्तरावरील नेते कसब्यात प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. दरम्यान, रासने यांच्या प्रचारातला भाजप नेत्यांचा एका प्रसंगाची आता चांगलीच चर्चा होत आहे.

भाजपाचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वजण एकाच वाहनातून निघाले. कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोचले. तेथून गणेश कला क्रिडा केंद्रातील निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोचण्यासाठी निघाले. मात्र, सर्वजण गाडीत बसले होते. सर्वात शेवटी चंद्रकांतदादा बसण्यासाठी आले. मात्र, गाडीत जागा नव्हती. त्यामुळे जागा करून देण्याआधीच चंद्रकांतदादा धीरज घाटे यांच्या मांडीवर बसले. गणेश कला क्रिडा रंगमंच येथील कार्यालयापर्यंतचा प्रवास त्यांनी घाटे यांच्या मांडीवर बसूनच केला. गाडीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक गणेश बीडकर, उमेदवार हेमंत रासने उपस्थित होते.

यावेळी झालेला संवाद घाटे यांच्या राजकीय करिअरसाठी उत्साह वाढविणारा ठरला. यावेळी घाटे बावनकुळे यांच्याकडे पाहात म्हणाले, ‘‘ खरंतर पालकमंत्र्यांनी आमच्या मांडीवर बसण्याऐवजी त्यांनीच आम्हाला मांडीवर घेतले पाहिजे.’’ त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘‘ धीरज योग्य वेळ आली की तुलाही मांडीवर घेऊ.’’ बावनकुळे यांच्या या उत्तराने सारेच हसले. बावनुकळे यांनी केलेल्या या विधानाने घाटे यांना राजकीय करिअरच्यादृष्टीने एक नवी आशा निर्माण झाली. कसब्यातील या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या दावेदारीत घाटे यांचे प्रमुख नाव होते. मात्र, पक्षाने रासने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने घाटे यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. या पाश्‍र्वभूमीवर बावनकुळे यांच्या विधानाने घाटे यांचा उत्साह वाढला आहे.

भाजपचे धीरज घाटे हे सु्द्धा कसब्याच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु उमेदवारी रासने यांना जाहीर झाली. पण, पक्षाचा हा निर्णय मानत त्यांनी भाजपच्या प्रचारात जोरदार भाग घेतला आहे. चंद्रकांत पाटील आणि धीरज यांच्या या प्रसंगामुळे भाजप एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जात आहे, असा संदेश या माध्यमातून जनमानसात गेल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT