Kasba By-Election : Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : धंगेकरांनी घेतली दाभेकरांची भेट : काँग्रेस एकजुटीने लढणार?

Ravindra Dhangekar : काँग्रेसमधली गटबाजी संपली का?

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसचे कसब्यातील नेते बाळासाहेब दाभेकरया दोघांची भेट झाली आहे. दाभेकर यांच्या कार्यालयात जाऊन धंगेकरांनी ही भेट घेतली आहे. कोणतीही नाराजी नाही, शंभर टक्के काँग्रेसचं काम करतोय, असं दाभेकर यांनी म्हंटलंय. कसब्यात आमचाच विजय निश्चित आहे. कार्यकर्ते चांगले काम करतील असे दाभेकर म्हणाले आहेत.

दाभेकर म्हणाले, आमच्यामध्ये कोणतीही नाराजी राहिलेली नाही. आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करणारच. सगळे कार्यकर्ते कामाला लागतील. महाशिवरात्रीचं उत्सव आहे. त्यामुळे जरा घडबडीचं वातावरण आहे. नाराजी नाही, काँग्रेसबरोबरच काम करणार, आमचा उमेदवार कसा निवडून येणार यासाठी आम्ही कार्यकर्ते कामाला लागणार आहोत.

यावेळी कसब्यातील उमेदवार धंगेकर म्हणाले, दाभेकर हे गेली चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये काम करतायेत. त्यांचं या भागामध्ये सामाजिक व राजकीय काम आहे. अनेक सामाजिक काम ते या भागात सातत्याने करत असतात. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांच्यासोबत अनके कार्यकर्ते काम करतात. मला जरी काँग्रेसची उमेदवारी मिळाली असली तरी, ते माझ्यासोबत आहेत, असा त्यांनी शब्द दिला आहे. मनापासून त्यांचे आभार मानतो, असे धंगेकर म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकवला होता. मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला फोन केला आणि आपण माघार घेतली असा दावा दाभेकरांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT