Raj Thackeray
Raj Thackeray  Sarkarnama
पुणे

Kasaba By-election News : कसबा पोटनिवडणुकीची रंगत वाढली; मनसेही आपल्या उमेदवाराची घोषणा करणार

सरकारनामा ब्यूरो

Kasaba Politics : पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. आज या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

येत्या २६ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवडच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तर काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीचे (NCP) देखील या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांबाबत आज ठरणार आहे.

तसेच या कसबा पोटनिवडणुकीत मनसेदेखील मैदानात उतरणार असून सोमवारी (दि.६ फेब्रुवारी) कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे. त्यामुळे या निवडुकीची रंगत अधिक वाढणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी राज ठाकरे पाहणार आहेत.

तसेच कसब्यााठी मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे आदींची नावे चर्चेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT