ajit pawar - devendra fadnavis Sarkarnama
पुणे

Kasba Chinchwad By-Election: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीत आज शेवटच्या दिवशी 'या' तोफा धडाडणार

Pune Election News : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीत आज शेवटच्या दिवशी 'या' तोफा धडाडणार

सरकारनामा ब्युरो

Pune News : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे, आज (शुक्रवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. रविवारी मतदान होणार आहे. कसबा पेठ मतदार संघात भाजपच्या आमदार मुक्ता टिळक,तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, तर आघाडीकडून नाना काटे हे मैदानात आहे. दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने भाजप आणि आघाडीमध्ये लढत होत आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहे. सभा, रॅली, मतदारांच्या भेटीसाठी नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. ही निवडणूक भाजप आणि आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थिती मतदार संघात विजय मिळवायचाच, यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

गेल्या तीन दिवसापासून येथील प्रचार हा शिगेला पोहचला आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील,भाजपच्या महासचिव पंकजा मुंडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनी हेमंत रासने यांच्यासाठी कंबर कसली आहे.

आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते, माजीमंत्री आदित्य ठाकरे आदींच्या सभा, रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. आज प्रचारासाठी दोन्ही पक्षाचे नेते मैदानात उतरणार आहेत

आज शेवटच्या दिवशीची अशी आहे रणधुमाळी

मुख्यमंत्री, फडणवीसांची सभा

कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिडे पुलापासून पदयात्रा काढणार आहेत. चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संध्याकाळी सभा आहे. डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

अजित पवार,आदित्य ठाकरेंचा रोड शो..

कॉंग्रेसचे कसबा पेठेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे करणार रोड शो करणार आहेत. आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम येथे एकत्रित सभा होणार आहे. चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांच्या रोड शोच आयोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT