Kasba Peth News : राज्यात सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप आमदारांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारसभा, रॅलीत गर्दी जमविण्यासाठी काही उमेदवारांकडून कॉन्ट्रॅक्ट दिला असल्याची चर्चा आहे.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराची रंगत वाढत आहे. सभा, पदयात्रांबरोबरच पत्रके वाटपाची लगबग सुरू आहे. त्यासाठी माणसांची मोठ्या प्रमाणावर गरज पडत आहे. पैसे देऊन माणसे आणणे हे आता नवीन राहिले नाही; परंतु त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशावरून सध्या शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्याची सध्या चर्चा सुरु आहे. ही आँडिओ क्लिप कुठल्या पक्षाची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निवडणुका आल्या की पैसे घेऊन प्रचारात सहभागी होणाऱ्यांची चांदी होत आहे. प्रचारासाठी पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न करणार तो उमेदवार कोण, अशी चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. "प्रचारामध्ये सामील व्हा, आणि मिळवा सात हजार रुपये," हा विषय चर्चेचा ठरला आहे.
एका एजन्सीकडून कसबा पेठेतील अनेक जणांना याबाबत फोन आले आहे, संबधीत एजन्सीचे सारसबागे जवळ ऑफिस असल्याचे त्या क्लिपवरुन समजते. "पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये काम केल्यानंतर सात हजार रुपयांचा मोबदला देऊ," असे या एजन्सीकडून एका व्यक्तीला सांगितले जात आहे.
पण कोणाच्या प्रचार रॅलीत सहभागी व्हायचं हे मात्र सांगितलं जात नाही.पैसे देऊन प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना सातशे, तर पुरुषांना दीड हजार रुपये रोज दिला जातो, अशी चर्चा यानिमित्ताने पुण्यात सुरु झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.