Katraj dairy election
Katraj dairy election sarkarnama
पुणे

कात्रज डेअरी निवडणूक : शिरूरला या कारणामुळे तिसरी जागा बोनस मिळाली!

संदीप भोरडे

गुनाट (जि. पुणे) : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) निवडणुकीसाठी शिरूर तालुक्यातून दोन जागा देण्याचे ठरले होते. मात्र, सर्वच निवडणुकांमध्ये आमदार अशोक पवार (Ashok pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) जोरदार कामगिरी केली आहे, त्यामुळे शिरूरला एक जागा बोनस स्वरुपात मिळाली आहे, असे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले. (Katraj dairy's third seat bonus to Shirur due to NCP's performance : Pradip Garatkar)

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे नुकताच मेळावा पार पडला. या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गारटकर यांनी वरील गोष्टीचा उलगडला केला. ते म्हणाले की, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.

आमदार अशोक पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी तरुणवर्ग ठामपणे उभा राहात आहे, त्यामुळे निवडणुकीत तरुणांना संधी दिली जात आहे. कार्यकर्त्यांची एकजूट व मतदारांच्या पाठिंब्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जसा एकहाती विजय मिळवला, तसाच एकहाती विजय जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही नक्की मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे, काका कोरेकर, पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, सागर निंबाळकर, सदाशिव पवार, केशरताई पवार, स्वप्नील ढमढेरे, निखील तांबे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT