कुट्टमंगलम, आलाप्पुझा, केरळ: 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामुळे श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. 'सकाळ रिलीफ फंडा' अंतर्गत पूरग्रस्त निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधण्यात आलेली दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत.  
पुणे

Wayanad Landslides: ‘सकाळ रिलीफ फंडा’ कडून ‘वायनाड’साठी २५ लाख! दानशूर व्यक्ती,संस्थांना मदतीचे आवाहन

Sakal Relief Fund For Wayanad: 'वायनाड' येथील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'सकाळ रिलीफ फंडा'कडून समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: केरळच्या वायनाडमधील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ माध्यम समूहातील 'सकाळ रिलीफ फंडा' तर्फे २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात व देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून 'सकाळ रिलीफ फंड' सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे.

आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत 'वायनाड' येथील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'सकाळ रिलीफ फंडा'कडून समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुडक्कई, चुरलमला, अट्टमला व नूलपुझ्झा या चार गावांमध्ये गेल्या मंगळवारी ता. (३०) पहाटे दोन वाजता मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन चारही गावे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. भूस्खलनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास २८१ वर पोचली आहे. १३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून अडीचशेहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.

यापूर्वीही 'सकाळ रिलीफ फंडा' ची केरळ साठी मदत ...

केरळ येथील एसएनडीपी शाळेचे बांधकाम पूर्ण :-

२०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आलाप्पुझा जिल्ह्यातील दुर्गम अशा कुट्टमंगलम भागातील श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या १०० वर्ष जुन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. या शाळेसाठी नवीन इमारत बांधकामासाठी 'सकाळ रिलीफ फंड' अंतर्गत जमा झालेल्या केरळ पूरग्रस्त निधीतून १ कोटी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. आज त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे.

मदतीचे आवाहन

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील प्रभावित चार गावांमधील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी समाजाला 'सकाळ रिलीफ फंड' कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

मदत करण्यासाठी:-

१. सकाळ रिलीफ फंड

HDFC Bank

A/C No : 57500000427822

IFSC : HDFC0000103

Branch - FC Road , Pune.

या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता.

. https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊ वर क्लिक करून आपली देणगीची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व बँक ट्रान्सफर मार्फत पाठवू शकता.

३. मदतीचे धनादेश सकाळ रिलीफ फंड या नावाने दैनिक 'सकाळ' च्या सर्व आवृतीनिहाय कार्यालयात (रविवार वगळून) ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

'सकाळ रिलीफ फंड' साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६०५०१७३६६

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT