Pune Rave Party .jpg Sarkarnama
पुणे

Pune Rave Party : कथित खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाचा प्रांजल खेवलकर यांसह इतर आरोपींना मोठा दिलासा

Pranjal Khewalkar News: काही दिवसांपूर्वीच पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली होती.

Deepak Kulkarni

Pune News: पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह इतर आरोपींना कथित ड्रग्ज रेव्ह पार्टी प्रकरणी जामीन मंजूर केला आहे.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी (ता.25) पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना मोठा दिलासा दिला आहे. खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती आणि आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली होती.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले होते. त्यांनी पोलिसांना खेवलकर यांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमधून 252 व्हिडीओ आणि 1749 नग्न तसेच अर्धनग्न फोटो जप्त करण्यात आल्याचं सांगितलं होतं. तसेच चाकणकरांनी खेवलकरांवर परराज्यातील मुलींवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती.

रूपाली चाकणकर यांनी त्यावेळी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आले. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला होता.

याचदरम्यान, रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांनी महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग केल्याचा दावा करताना त्यांच्या मोबाईलमध्ये 1 हजार 749 अधिक नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याची माहिती दिली होती. 234 फोटो 29 व्हिडिओ अश्लील आहेत, नशा देऊन लैंगिक अत्याचार केलेले आहेत. हे फोटो, व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आल्याचंही चाकणकर यांनी सांगितलं होतं.

पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी खराडीत एका प्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत प्रांजल खेवलकरांसह इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील ड्रग्ज पार्टी झाल्याचा दावा केला होता.मात्र, प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT