Arun Chaudhari
Arun Chaudhari Sarkarnama
पुणे

खेडमध्ये सभापतिपदासाठी पुन्हा राजकीय घमासान; राष्ट्रवादीच्या चौधरींचा राजीनामा

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी सहा महिन्यांपूर्वी विराजमान झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अरुण चौधरी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपुर्त केला. (Khed Panchayat Samiti Chairman Arun Chaudhari resigns)

खेड पंचायत समितीचा सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाल संपत आला असताना आता खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शांत झालेले राजकीय महानाट्य आता पुन्हा रंगणार, असे चित्र निर्माण झाले आहे. खेड पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसीसाठी राखीव आहे. त्यातच ओबीसी आरक्षण नुकतेच रद्द झाले आहे. पुढेही काही दिवसांत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागणार आहे. निवडणूक आयोगाचे नियम आणि सभापतीपदाची पुढील निवडणूक होणार का नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या सदस्यांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला होता. सभापतीपदासाठी तब्बल १०१ दिवस राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप सदस्य राजकीय सहलीवर गेले होते. याच दरम्यान सहलीवर असलेल्या ठिकाणी सदस्य आणि तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांच्यात हाणामारी होवून गुन्हे दाखल झाले होते. राज्यात या घटनेची मोठी चर्चा झाली होती. गाजलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीदेखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण संभाजी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली होती.

राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असणारे तीन पक्ष तालुका पातळीवर एकमेकांचे विरोधक आहे, त्यामुळे आता खेड पंचायत समितीवर शिवसेनेला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT