Pimpri-Chinchwad Crime News
Pimpri-Chinchwad Crime News  Sarkarnama
पुणे

खळबळजनक! नरबळीसाठी तीन वर्षीय बालिकेचे अपहरण; दहा तासातच पोलिसांनी केली सुटका...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : साडे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Police) दाम्पत्याला अटक केली असून दहा तासातच या बालिकेची सुटका केली आहे.

पोलिसांनी तपास करत नरबळीचा प्रकार उघडकीस आणला आहे. चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या दोनशे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला आणि या संवेदनशील प्रकरणाचा अवघ्या दहा तासातच उलगडा केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक तर दोन अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले. (Crime News)

संतोष मनोहर चौघुले (वय 41) व विमल चौघुले (वय 28, दोघेही रा. महादेव नगर, जुन्नर ) अशी आरोपींची नावे आहेत. या दाम्पत्याने बालिकेच्या अपहरणाचा प्लॅन केला होता. त्यानुसार विमल चौघुलेने पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेली तिची बहीण सुनीता नलावडे हिला याची कल्पना दिली. तिने घराजवळील कुटुंबात साडे तीन वर्षाची मुलगी असल्याचे कळवले होते. यासाठी विमलने त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला बहिणीच्या घरी पाठवले. तो त्या मुलीला खाऊ द्यायचा, तिच्यासोबत खेळायचा. दरम्यान, शनिवारी (ता. 23 जुलै) दुपारी खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला घरापासून दूर नेले. तेथून विमलने मुलीला जुन्नरला नेले.

दरम्यान, बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले बारा वर्षाच्या मुलासोबत बालिका दिसून आली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने विमलच्या घरी जुन्नर पोलिसांना पाठविले. तिथे बालिका आढळली. तेथून बालिकेची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, नरबळीसाठी या बालिकेचे अपहरण केल्याचे बोलले जात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT