Ruby Hall Latest Crime News
Ruby Hall Latest Crime News  Sarkarnama
पुणे

किडनी प्रत्यारोपण प्रकरण 'रूबी' ला भोवणार ; ग्रँट यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

पुणे : किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) प्रकरणी अखेर शहरातील नामांकित रूग्णालय रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic )व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, (Dr. Pervez Grant) कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलिस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच तक्रारदार महिलेचेही नाव या गुन्ह्यात नाव समाविष्ट करण्यात आले आहे. (Ruby Hall Latest Crime Marathi News)

डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सव्हिर्सेस), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे (कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट), डॉ. मुफ्त भाटी (युरोलॉजिस्ट), डॉ. हिमेश गांधी (युरोलॉजिस्ट), सुरेखा जोशी (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर) यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये किडणी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यांनतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला साळुंखे याने १५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, ते पैसे न दिल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा किडणी तस्करीचा प्रकार उघड झाला होता.

याप्रकरणात आता रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ज्या महिलांनी पैशासाठी किडनी विकली त्या महिलेला देखील आरोपी करण्यात आले आहे. किडणी प्रत्यारोपनाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे संबंधित रूग्णालयचे व्यवस्थापकीय विश्वस्त हेदेखील जबाबदार असल्याने त्यांचेही नाव या गुन्हात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT