Chandrakant Patil and Kunal Tilak Sarkarnama
पुणे

Kunal Tilak on Chandrakant Patil : चंद्रकांतदादांच्या 'त्या' विधानाला कुणाल टिळकांचा आक्षेप; म्हणाले...

Pune BJP News : भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना तिकीट का दिलं नाही याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.

गेली ३० वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र, टिळक कुटुंबियातील उमेदवारी न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मात्र, भाजपमध्ये काही अंतर्गत कलह आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत टिळक कुटुंबाला उमेदवारी न देण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत वेळ द्यावा लागला. त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक 'एक्जिस्टन्स' कमी झाला होता", असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचे हे विधान वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आणि भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ''मतदारसंघात आई आजारी असताना सुद्धा तिचा संपर्क कमी झाला नव्हता'', असं कुणाल टिळक म्हणाले.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजपला नमवत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे आमदार झाले. या निवडणुकीची चर्चा अजूनही होत आहे. यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपमध्ये धुसफूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT