Maratha Reservation Issue In Maharashtra : राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने राजीनामा दिल्याने राज्य सरकारला झटका बसला आहे. आयोगातील राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. आयोगाचे आणखी एक सदस्य लक्ष्मण हाके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महिनाभरात आयोगातील चार जणांनी आतापर्यंत राजनामा दिला आहे.
मराठा सामाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून राज्यात वाद सुरू आहे. याचे पडसाद राज्य मागासवर्ग आयोगातही उमटत आहेत. पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाकडे लक्ष्मण हाके यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. हाके हे जून 2021 पासून आयोगाचे सदस्य होते. आयोगाच्या बैठकीत वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हाके यांनी राजीनामाची प्रत पाठवली आहे.
दोन दिवसांपूर्वीच बालाजी किल्लारीकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले नाही तरी ईडब्ल्यूएससारखा विशिष्ट वर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल, अशी आपली भूमिका होती. पण सरकारच्या आणि आपल्या भूमिकेत फरक असल्याने राजीनामा दिल्याचे बालाजी किल्लारीकर म्हणाले होते. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता 400 कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली होती. आता राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकापाठोपाठ राजीनामे देत असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रक्रियेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.