पुणे

Andekar video entry from jail : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदेकरांची थेट जेल मधून ‘व्हिडीओ एंट्री’

Andekar municipal meeting news : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदेकरांनी थेट जेलमधून व्हिडीओद्वारे हजेरी लावल्याने खळबळ. संपूर्ण बातमी आणि प्रतिक्रिया जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती लावली. दोघीही आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी असून, न्यायालयीन कोठडीत होत्या. तरीही महापालिकेच्या सभेला ऑनलाइन हजर राहण्याची न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी ही उपस्थिती लावली.

सोनाली आंदेकर या दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत तसेच लक्ष्मी आंदेकर या बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आल्या होत्या. दोघींनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

खुनाचा गुन्हा आणि पार्श्वभूमी

दोघींवर आयुष कोमकर याच्या खुनाच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. हा खून २०२५ मध्ये नाना पेठ परिसरात घडला होता. आयुष कोमकर हा आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातील बदला म्हणून मारण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर , सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांसह १५-१६ जणांवर खुनाचा, कट रचण्याचा आणि षड्यंत्राचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपींना येरवडा किंवा कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

आणि सभेला उपस्थिती

दोघींना प्रथम अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. नंतर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र त्यांना जमीन मिळू शकला नाही. त्यानंतर कोर्टात युक्तिवादानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (ऑनलाइन) पद्धतीने सहभागी होण्याची परवानगी मागण्यात अली.

न्यायालयाने ही विनंती मान्य केली त्यानंतर सभेला ऑनलाइन उपस्थित राहण्याची मंजुरी दिली. त्यामुळे निवडणुकीनंतर प्रथमच महापालिकेच्या सभेला दोघी उपस्थित राहिल्या. या घटनेने पुण्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

दरम्यान, सलग 3 महिने जीबी उपस्थित न राहिल्यास थेट नगरसेवक पद रद्द करण्याचा महापालिका अधिनियम आहेत. त्यामुळे आणि अजून कालावधीसाठी च्या जर जीबीला उपस्थित राहिल्या नसत्या तर त्यांचं पद रद्द करण्यात आला असता त्यामुळे त्यांना ऑनलाईन उपस्थितीची परवानगी देण्यात आली असल्याचा सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT