Corona  Sarkarnama
पुणे

मंगल कार्यासाठी कमाल उपस्थितीचे बंधन उठवा

दिवाळीनंतर लग्नसमारंभ तसेच साखरपुडा यासारख्या शुभविधींचे नियोजन अनेक कुटुंबात केले जाते.

सरकारनामा ब्यूरों

पुणे : कोरोनाचे निर्बंध संपूर्ण राज्यात बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, दुकाने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळ,बाजार, चित्रपटगृहे, नाट्यगृह सगळेच खुले होत आहे.या पाश्‍र्वभूमीवरवर पुण्यात लग्नसमारंभ, साखरपुडा यासारख्या कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा शिथील करावी, अशी मागणी क्रियेटिव्ह फाऊंडेशनच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोरोनचे निर्बंध कमी झाल्याने मुक्त वातावरणात सामान्य नागरिक मोकळा श्वास घेत असून कोरोनाच्या संकटातून मुक्त होत सर्वत्र नवचैतन्य संचारत आहे. या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एकदाच येणाऱ्या आनंदाच्या क्षणांना मात्र बंधन घालण्यात आले आहे. विवाह समारंभ असो किंवा साखरपुडा, बारसं असो वा डोहाळजेवणं, मंगळागौर यासारखे कार्यक्रम 100 किंवा 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याचे बंधन अद्याप कायम आहे.

सर्वकाही नॉर्मल होत असताना उपस्थितीचे बंधनदेखील शिथिल करणे गरजेचे आहे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला शंभर-दोनशे लोकांच्या उपस्थितीची अट असली तरी कमी उपस्थितीत कार्यालय भाड्यासह भोजनाच्या दरापर्यंत सर्वच महाग पडत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी त्रिसूत्रीच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घालून शुभ कार्यातील संख्यचे बंधन शिथिल करावे अशी आग्रहाची मागणी फाऊंडेशनच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याके करण्यात आली आहे.

दसरा झाला आता दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे. लोक बाहेर पडू लागले आहेत.दिवाळीनंतर लग्नसमारंभ तसेच साखरपुडा यासारखे शुभविधींचे नियोजन अनेक कुटुंबात केले जाते. कोरोनाची भीती कमी झाली आहे.अशावेळी या कार्यक्रमांच्या कमाल उपस्थितीचे बंधन उठविले तर मोठ्यासंख्येने लोकांना या समारंभात उपस्थित राहता येईल.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT