Ramesh Thorat vs Rahul Kul  sarkarnama
पुणे

Local Body Election : कुल-थोरात पुन्हा आमनेसामने! दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद गटात ‘काँटे की टक्कर’

Ramesh Thorat vs Rahul Kul : जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे. दौंड तालुक्यातील गट आणि गणामधील आरक्षणामुळे पुन्हा एकदा राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात समर्थकांची लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Daund Politics : दौंड तालुक्यातील राजकारण म्हटले की ते नेहमीच कुल-थोरात या दोन घराण्यांच्या भोवती फिरते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घराण्यांतील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

आमदार राहुल कुल (भाजप) आणि माजी आमदार रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस) हे दोघेही महायुतीत असले तरी त्यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा रंगणार आहे. ही निवडणूक उमेदवारांची नसून कुल-थोरात घराण्यांची असल्याने, तालुक्यात काँटे की टक्कर निश्चित झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने, या निवडणुकीकडे राज्याचेही लक्ष लागले आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्या मुलाला राजकारणात उतरवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. योगायोगाने त्यांच्या बोरीपार्धी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाले असून, तुषार थोरात यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात आहे.

आता भाजपकडून कोणाला या गटात उमेदवारी दिली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण हा सामना थेट कुल विरुद्ध थोरात असा असणार आहे.

दरम्यान, राहू जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आरक्षित असल्याने येथे भाजप आणि राष्ट्रवादीकडून इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. आमदार राहुल कुल आपल्या गटात कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे.

यवतमध्ये नवखा चेहरा?

यवत जिल्हा परिषद गट यंदा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारण गटातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. येथे दोन्ही पक्षांकडून नवखे चेहरे मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे.

खडकी गट सर्वसाधारण निघाल्याने राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची चढाओढ आहे.

वरवंडमध्ये कोण?

वरवंड आणि पाटस गट हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने, या भागातील नेत्यांच्या पत्नींना निवडणुकीत उतरवण्याची हालचाल सुरू आहे. वरवंड गटात पारगावचा समावेश असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे.

गोपाळवाडी गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने, माजी जिल्हा परिषद सभापती नीता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT