Local Body Election bombay High Court Sarkarnama
पुणे

Pune Politics: बारामती पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील आणखी एका नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली; नवी तारीख जाहीर

Fursungi Municipal Elections Postponed: फुरसुंगी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. येथील नगराध्यक्ष तसेच इतर सर्व सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आली आहे.

Mangesh Mahale

राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील आणखी एका नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारामती पाठोपाठ फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक ही पुढे ढकलली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे, दौंड आणि सासवडमधील काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

फुरसुंगी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. येथील नगराध्यक्ष तसेच इतर सर्व सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आली आहे. येथील निवडणूक प्रक्रिया 4 डिसेंबर पासून सुरू पुन्हा सुरू केली जाणार आहे. 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर नंतर म्हणजेच २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका ४ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत.

या प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर त्या ठिकाणच्या निवडणूकांसाठी या आदेशासोबत सुधारीत वेळापत्रकानुसार निवडणूकीचा कार्यक्रम राबवावा, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 लोणावळा, तळेगाव दाभाडे, दौंड व सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सदस्य पदासंदर्भात देखील जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. सदर अपीलावर देखील न्यायालयाने दि. २२ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाल पारीत केलेला असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या जागा क्र. २ (अ), ७ (अ), ७ (ब), ८ (अ), ८ (ब) व १० (ब), लोणावळा नगरपरिषदेच्या जागा क्र.५ (ब) व १० (अ) व दौंड नगरपरिषदेच्या जागा क्र.९ (अ) व सासवड नगरपरिषदेच्या जागा क्र. ११ (अ) या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी देखील आता दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आणि मोहोळ, सांगोल्यातील प्रत्येकी दोन व मैंदर्गी, पंढरपूर नगरपरिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २२ नोव्हेंबरनंतर ज्या नगरपरिषदांमधील अपिलांचे न्यायालयात निकाल लागले. त्यांचा निवडणूक कार्यक्रम लांबला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT