Vijay Shivtare, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : विरोधक अन् मित्र कसा असावा, हे शिवतारेंकडून शिका! अजितदादांकडून कौतुकाचा वर्षाव...

Rajanand More

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी आज पुण्यात सभा झाली. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar News ) एकाच व्यासपीठावर आहेत. या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे देशमुख यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला.

अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले. ते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षातून शिंदेंच्या सेनेत येत असल्याचे समजताच अजितदादा म्हणाले, जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भोर, वेल्हा, मुळशीमध्ये त्यांची किती ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ही किमया विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.

विरोधक कसा असावा लागतो, हे यांच्याकडे बघून शिका. मित्रही कसा असावा लागतो, तेही विजयबापूंकडे बघून शिका. एकदा मैत्री केली की, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाही. अशापद्धतीचे काम विजय शिवतारेंचे असल्याचे कौतुक अजित पवारांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी माघार घेत सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला. सासवडमध्ये त्यांनी त्यासाठी सभाही घेतली. त्यानंतर आज कोंडे यांना पक्षात आणत त्यांनी दादांना मोठा दिलासा दिला आहे. कोंडे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात दोनदा निवडणूक लढली आहे. त्यांना मिळालेली मतेही लक्षणीय होती.  

भाषणादरम्यान अजितदादा म्हणाले, आपली आता चांगल्या पद्धतीने युती झाली आहे. त्याला कुठेही दृष्ट लागू द्यायचे काम करायचे नाही. विजय शिवतारेंमुळे पुरंदर आणि हवेली मतदारसंघांत ताकद वाढली आहे. भोर-वेल्हामध्ये कुलदीप कोंडेंमुळे आपली ताकद वाढली आहे. त्यांनाही तसाच मानसन्मान महायुतीकडून मिळेल, असा शब्द मी कोंडेंना देतो.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT