Eknath Khadse, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : सूनबाईविरोधात प्रचार करायला खडसेंचा नकार; सुप्रिया सुळे म्हणतात...

Lok Sabha Election 2024 : रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास एकनाथ खडसेंनी नकार दिला आहे. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही कुटुंबातील व्यक्ती एकामेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळणार आहे. यातील सर्वात मोठे उदाहरण बारामती मतदारसंघांमधून पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्या ठिकाणीदेखील खडसे कुटुंबीय दोन पक्षांमध्ये विभागल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नते एकनाथ खडसे यांनी सूनबाईच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला आहे. यावर खासदा सुप्रिया सुळे (Supriya Sule News) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील वीज दरवाढीविरोधात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) कडून करण्यात आलेल्या आंदोलनात आज सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे (Pune) जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार बहुमताने विजय होतील. आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरतो तेव्हा नागरिक महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत. लोकांना केंद्रामध्ये बदल हवा आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नागरिक या सरकारला धडा शिकवतील, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या बारामती मतदारसंघामध्ये (Baramati Constituency) दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सूनबाई आणि भाजप (BJP) उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार न करण्याच्या एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर बोलताना त्या म्हणाल्या, यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की कुठेतरी सुसंस्कृतपणा अद्याप बाकी आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

आत्तापर्यंत आयआयटी मुंबई या ठिकाणी पूर्वी 100 टक्के प्लेसमेंट होत होत्या. यंदा मात्र 40 टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी मिळालेली नाही. यातून देशांमध्ये बेरोजगारी वाढते आहे, हे स्पष्ट होत आहे. डेटा काढून पाहिला तर 70 वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी सध्या देशांमध्ये असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

(Edited By - Rajanand More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT