Pune Political News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस आहे. राज्यातील पाच टप्प्याच्या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. यात कोण बाजी मारणार हे चार जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असल्याची बोलले जात आहे.
देशात लोकसभेसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होत असून चार जून रोजी निकाल लागणार आहे. राज्यात पाच तर जिल्ह्यात दुसऱ्या 7 आणि तिसऱ्या 13 मे या दोन टप्प्यात मतदान झाले. बारामती आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवार गट आमनेसामने आहेत. पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत झाली तर मावळात शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटात टशन आहे.
पुणे जिल्ह्यात चारही लोकसभा मतदारसंघात मतदान मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे Suhas Divase यांनी सांगितले आहे.मतदानानंतर इव्हीएम ठेवले त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार बारामतीची मतमोजणी कोरेगाव, शिरूरची कोरेगाव आणि रांजणगाव, पुण्याची मतमोजणी कोरेगाव तर मावळची बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मतमोजणी दिवशी पोस्टल मतदानाची मोजणी आठ वाजता आरो हॉलमधे होणार आहे. त्यानंतर साडेआठला ईव्हीएमची मोजणी सुरू होईल. त्यासाठी पुण्यात पुणे 21 टेबल फेऱ्यात मतदान संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. बारामती 24, मावळमधे 25 तर शिरूरमधे मतमोजणीच्या 28 फेऱ्या होतील. फेरीप्रमाणे मतमोजणी कळवण्यात येणार असल्याचेही दिवसेंनी स्पष्ट केले आहे. यानुसार जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये कोण गुलाल उधळणार हे दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.