Pune Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते. पण, भुजबळांनी नकार दिल्याने ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. हे विधान करत कोल्हे यांनी पुन्हा एकदा आढळराव यांना डिवचले आहे.
अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर, शहराध्यक्ष तुषार कामठे, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.
कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. माझ्या समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. मात्र, अनेक पक्षातून बेडूक उड्या घेऊन आलेल्या उमेदवारावर बोलणे योग्य नाही, असा टोला कोल्हेंनी लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधकांची केविलवाणी परिस्थिती झाली असल्याचा निशाणा कोल्हेंनी साधला आहे. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा होता, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.
भुजबळांनी नकार दिल्याने ही उमेदवारी आढळरावांना देण्यात आली. त्यामुळं ते सक्षमही नाहीत आणि बाय चॉईसही उमेदवार नाहीत. अश्या वयस्कर व्यक्तीवर काय बोलायचं, असा खोचक सवालही कोल्हेंनी केला. कोल्हे यांच्या या टीकेला आढळराव काय उत्तर देणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळांची होती नाशिकमधून तयारी?
दरम्यान, कोल्हे यांच्या दाव्यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. भुजबळ यांनी सुरूवातीपासूनच नाशिक लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली होती. पण ते तिथून लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिरूरमधून त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिंदे उत्सुक होते, असा दावा कोल्हेंनी केला आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे, हे आता भुजबळ यांच्याकडून स्पष्ट केले जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.