पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या नेते मंडळींकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदार रवींद्र धांगेकर इच्छूक असून ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत.
भाजपकडून देखील लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी यादी असली तरी ऐनवेळी पुणे लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देवेंद्र फडणवीसांबाबत विचारले असताना त्यांनी मोठे विधान केले. मी 30 वर्षांपासून राजकीय जीवनामध्ये आहे. मला जेव्हा जेव्हा पक्षाने सांगितले तेव्हा मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी जनतेमध्ये राहून काम करत असून जनतेतून निवडणूक लढवण्याचा आवाज आल तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.
जनतेने सध्या 'धंगेकर पॅटर्न' (Dhangekar Pattern) असा प्रचार करण्यास सुरुवात केली असून मी वैयक्तिक माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा प्रचार सुरू केलेला नाही. पुणेकरांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर जे चित्र कसबा निवडणुकीच्या वेळेस दिसलं तेच चित्र या लोकसभा निवडणुकीवेळी देखील दिसेल, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे माझ्या विरोधात पुणे लोकसभा निवडणुकीत कोणी उतरला तरी फरक पडणार नाही, असे धंगेकरांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर लोकसभेच्या मैदानात उतरले तर पुण्यातील ब्राह्मण समाजाचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. यावर धंगेकर म्हणाले, ब्राह्मण समाज हा हुशार असून प्रत्येक निवडणुकीमध्ये तो निर्णायक मतदान करत असतो. तो कोणताही एका पक्षाचे काम करत नाही. ते कार्यकर्ता बघून काम करतात आणि केले. अनेक वर्षे ब्राह्मण समाज माझ्या पाठीशी उभा राहिला आहे.
कसबा निवडणुकीच्या वेळी देखील हेच चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे फडणवीस किंवा त्यांच्यापेक्षा वरचा कोणीही मोठा कोणी जरी आला तरी मी कोणाला घाबरत नाही. पक्षाने सांगितल्यानंतर पुढे कोणीही असले तरी मी निवडणूक लढायला तयार आहे, असे रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.