BJP Advt Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : निवडणूक जाहीर झाली, तरीही अनेक भिंतींवर 'कमळ' अन् 'अब की बार..' तसंच!

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपने देशभर अब की बार...ही घोषणा रंगवली होती. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नव्हते.मात्र,निवडणूक जाहीर झाल्यानंतर या घोषणा पुसून टाकणे स्थानिक प्रशासन म्हणजे महापालिकेचे काम होते. मात्र,अद्याप त्या तशाच ठेवल्याने आचारसंहिता भंग होत असल्याच्या आणि प्रशासन हे भाजपला मदत करीत असल्याच्या तक्रारी निवडणूक आय़ोगाकडे करण्यात आल्या आहेत.

आयोगासह, पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडेही या तक्रारी करण्यात आल्या असून त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यात करण्यात आली आहे.याच महिन्यात शहरात चिंचवडमध्ये दोन भिंतीवर रंगवलेल्या `अब की बार,चार सौ पार, या घोषणेवर शाईफेक झाली तथा तिला काळे फासले गेले होते. हा प्रकार लक्षात येताच भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुरेश भोईर (क्र.18अ)यांनी काळे फासलेल्या अब की...च्या घोषणेवर पांढरा रंग लावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरात शेकडो भिंतीवर भाजपने(BJP) रंगवलेले कमळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आणि घोषणा हे निवडणूक जाहीर होऊन आठवडा झाल्यानंतरही कायम असल्याने तो आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे. ते काढून त्याला जबाबदार असलेल्यांवर दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे केली आहे. शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दलही कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपला प्रशासन मदत करीत आहे का? -

शहरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी रंगविलेले भाजपचे कमळ हे कायम असल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे(AIMIM )पिंपरी- चिंचवड अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार शनिवारी (ता.२३) केली. याप्रकरणी सबंधितांवर गुन्हा दाखल करावा,असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. महापालिका प्रशासन व निवडणूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे भाजपला मदत होते आहे,असा आरोप त्यांनी केला.

भोसरीतील नागरिकांची सजगता -

संपूर्ण उद्योगनगरीत भाजपने रंगवलेल्या 'अब की बार मोदी सरकार', 'अब की बार भाजप सरकार', अब की बार,चारसौ पार'या घोषणांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार तळवडेतील सजग नागरिक श्रीनिवास बिरादार यांनी प्रत्यक्ष पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयात जाऊन शुक्रवारी दिली. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याने या घोषणा हटविण्याची मागणी त्यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT