Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.
एकीकडे नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला, तर दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघात पोलिसांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या योगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये सर्च ऑपरेशन केल्याचं पाहायला मिळालं.
यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 'हाय व्होल्टेज' लढत ही बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असतानाच त्यांच्या विरोधात पवार कुटुंबातीलच युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागला आहे.
अशातच मतदानाला एक दिवस बाकी असताना सोमवारी रात्री पोलिसांकडून शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलं. या शरयू मोटर्सचे मालक महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार असलेल्या युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार असल्याचं बोललं जात आहे.
बारामती तालुक्यातील मेडद गावात असलेल्या शरयू मोटर्सवर पोलिसांकडून सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन केल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार असून त्यांचे पुत्र युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये या घटनेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
प्रशासनाकडून भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली आहे. बारामतीचे विभागाचे मुख्य निवडणूक अधिकारी वैभव नावडकर ज्यांना याबाबत सांगितले की, निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने एका विशेष पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येतात.
त्याच पद्धतीने शरयू टोयाटो कंपनीत देखील तपास करण्यासाठी पथक गेले होते. मात्र त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आले नाही. मतदानाला एक दिवस बाकी असताना अशा प्रकारचं सर्च ऑपरेशन झाल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.