Jai Pawar Sarkarnama
पुणे

Jai Pawar : जय पवारांनी बारामतीमधून अजितदादांना मिळणारा लीड सांगितला

Jay Pawar Baramati prediction: राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे बारामतीमध्ये किती मताधिक्य मिळणार यावर त्यांचे पुत्र जय पवार यांनी मोठं भाष्य केले.

Sudesh Mitkar

Pune News : यंदाचा विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे योगेंद्र पवार निवडणूक रिंगणात आहेत. केला काही निवडणुकांमध्ये अजित पवार हे महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन बारामतीमधून निवडणूक जिंकत आले आहेत.

यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आणि विजय उमेदवाराला किती मताधिक्य असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अजित पवारांच्या विजयाचं मार्जिन सांगितलं आहे.

बारामतीमध्ये बोलताना जय पवार म्हणाले, "माझ्या आजी आमच्या कुटुंबामध्ये सर्वात वरिष्ठ आहे. त्यांनी स्वतःहून बारामतीमध्ये (Baramati) येण्याचा निर्णय घेतला आहे. मी आज काटेवाडीमध्ये जाऊन आजींचे आशीर्वाद देखील घेतले आहेत". आजी आज युगेंद्र पवार यांच्या घरी जाणार आहेत. त्याबाबतचे फोटो देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. आजी स्वतःचे निर्णय घ्यायला स्वतंत्र असल्याचं जय पवार यांनी सांगितलं.

आईची तब्येत बरी नसताना तिला राजकारणात खेचणं बरोबर नाही, अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली होती. त्याबाबत बोलताना जय पवार म्हणाले, "आजी आजारी असल्याचे कळाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) दौरा सोडून बारामतीत आले आणि त्यांनी आजीला मुंबईला नेलं. त्यानंतर आजीची सर्जरी झाली तेव्हा अजित पवार त्यांच्या सोबतच दवाखान्यात होते आणि त्यानंतर अनेक दिवस देवगिरी बंगल्यावर आजी दादांसोबत राहत आहेत". त्यामुळे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला आणि त्या बारामतीत आल्या त्यांना दादांबाबतच प्रेम व्यक्त करायचं होतं, असं जय पवार म्हणाले.

अजितदादांच्या हेलिकॉप्टरची देखील तपासणी झाली

श्रीनिवास पवार यांच्या शरयू या शोरूमवर सर्च ऑपरेशन करण्यात आलं याबाबत विचारला असता जय पवार म्हणाले, "निवडणूक आयोगाचे नियम सर्वांना सारखे असतात, यातूनच अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची देखील तपासणी करण्यात आली. तसेच ज्या पद्धतीने शरयू मोटर्सवर सर्च ऑपरेशन करण्यात आलं तसंच सर्च ऑपरेशन नटराज येथे देखील करण्यात आलं. मात्र फक्त एकाच ठिकाणी सर्च ऑपरेशन झाल्याचं दाखवून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली".

अजितदादांना एवढं असेल मताधिक्य

जय पवार पुढे म्हणाल, "बारामतीकर नेहमीच पवार कुटुंबावर प्रेम करत आले आहे. त्यानुसार त्यांनी ठरवलं होतं की लोकसभेला सुप्रिया सुळे, तर विधानसभेला अजित पवार, त्यानुसार बारामतीकरांनी लोकसभेला साहेबांबाबत प्रेम दाखवलं आणि आता ते अजित पवारांचं काम पाहून त्यांच्यावर प्रेम दाखवतील". या निवडणुकीत अजित पवार यांना किती मताधिक्यावर जय पवार म्हणाले, 'गुलाल आमचाच असणार आहे. अजित पवार यांचे लीड एक लाखाच्या पुढे असेल".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT