Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचासाठी शरद पवारांनी आंबेगावमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही, वळसे पाटलांना पराभूत करा, असे आवाहन शरद पवारांनी केले.
शरद पवार म्हणाले, दिलीप वळसे पाटलांना आमदार केले, मंत्री केले, विधानसभेचे अध्यक्ष केले. जेजे देणं शक्य होते ते दिलं. ते म्हणाले शरद पवार आमचे संबंध चागंले आहेत ते माझ्यावर बोलणार नाहीत ते साफ खोटं आहे.
'त्यांनी बोलायला काय ठेवलंय? काहीच ठेवलं नाही. त्यांची एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दर केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. साडेतीन वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्यानंतर संभाजीराजेंशी गणोजी शिर्केंनी गद्दर केली. ते महाराष्ट्र विसरला नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही. मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये वळसे पाटीलांना पराभूत करा.', असे आवाहन शरद पवारांनी केले.
शरद पवार म्हणाले, माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकरला येते. वळसे पाटलांची घरी जाते. यावेळी त्या भीमाशंकरला आल्या होत्या. मी त्यांना विचारले तुम्ही कशा गेल्या. त्या म्हणाल्या आम्ही थेट भीमाशंकरच्या दारी गेलो. आम्ही वळसे पाटलांच्या घरी गेलो नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं आम्ही त्यांच्या दारात गेलो नाही.
मुख्यमंत्र्यांनी बहिणींना काही आर्थिक मदत करत ठरावीक रक्कम द्यायचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रामध्ये दररोज कुठे कुठे भगिनीवर अत्याचार झाला ही बातमी ऐकायला मिळतेय. ठाणे लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले. सहा महिन्यात जवळपास 1400 मुली गायब झाल्या. एका बाजुला लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसऱ्या बाजुला होणारे अत्याचार बघायचे. ही वागणूक सरकार देतय जे बहिणींचे रक्षण करू शकत नाही. त्यांना पाठींबा द्यायची नाही. आमचे सरकार आले तर आम्ही भगिनींना आर्थिक मदत करूच शिवाय संरक्षणही करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.