Maharashtra Budget 2023 LIVE Updates  Sarkarnama
पुणे

Maharashtra Budget 2023 : ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं राऊतांनी..; राणेंचा गौप्यस्फोट

Maharashtra Budget 2023 LIVE Updates : नितेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Budget 2023 LIVE Updates : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ म्हटल्याने विधान सभा आणि विधान परिषदेत आज गोंधळ उडाला. विधीमंडळाचे काम सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी राऊतांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.

विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली.

"रोज सकाळी बसून आम्हाला संजय राऊतांना ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? त्याचं आपण काय खाललं आहे. त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध काय आहे ? 'सामना'च्या आधी राऊत 'लोकप्रभा'मध्ये होते. तेव्हा शिवसेनेच्या विरोधात त्यांचे लेख असायचे," असे राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात राऊतांनी 'लोकप्रभा'मध्ये लिहिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. राऊतांचं दहा मिनिटे पोलीस संरक्षण काढा. परत उद्या सकाळी ते दिसणार नाहीत,"

"विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे, ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे," असे वादग्रस्त विधान खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केले आहे. राऊत कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

"संजय राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला आहे.आम्हाला चोर म्हणतात, आम्ही चाळीस चोरांनी त्यांना निवडणूक दिले आहे. आमच्या मतांवर ते खासदार झाले.चोरांच्या मतावर निवडणूक आलेल्या राऊातांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा," अशी संतप्त भावना गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, "विधीमंडळाच्या प्रतिष्ठेबद्दल, सन्मानाबद्दल अपमान होत असेल तर परंपरेनुसार काही निर्णय झाले तर मान्य केले पाहिजेत. सभागृहात हा विषय आला तेव्हा मी येथे नव्हतो. सभागृहात काय विषय चाललाय याची माहिती घेतली. पण तो कोणत्या टिपेला गेला हे मला माहित नाहीत. पण अध्यक्षांच्या मार्फत मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की परंपरेनुसार, चहापानाला बोलावलं जातं. आम्ही चहापानाला गेलो नाही, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले. हेच मुख्यमंत्री अडीच वर्षे मांडीला मांडी घालून बसले होते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT