Madhuri Misal
Madhuri Misal sarkarnama
पुणे

Madhuri Misal : माधुरी मिसाळ होणार पुण्यातील पहिल्या महिला मंत्री ?

सरकारनामा ब्युरो

पुणे : सत्तासंघर्षात अडकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला (maharashtra cabinet expansion)अखेर मुहूर्त सापडला आहे.उद्या (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. (maharashtra cabinet expansion news update)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 35-65 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. राजभवनावर नव्या मंत्र्यांना शपथ देण्याची तयारीही जोरात सुरू आहे. मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार, या बाबत काही नावांची चर्चा आहेत.

भाजपकडून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठांना संधी देण्यात येत आहे. त्याच चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. याशिवाय नितेश राणे यांना देखील नव्याने संधी मिळू शकते. पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे.

पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना कुठलं मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वर्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मिसाळ यांना पक्षश्रेष्ठींनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली उद्या मुंबई मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यावेळी माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना कुठलं पद मिळतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील भाजपचं वजनदार महिला नेतृत्व म्हणून मिसाळ यांची ओळख आहे. पुण्यातील मंडई परिसरातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर मिसाळ यांनी पर्वती मतदार संघातून आमदारकीची हॅट्ट्रिक केली आहे. 2019 मध्ये भाजपच्या पुणे शहराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते.

एकनाथ शिंदे गटाकडून जे महाविकास आघाडीत असताना जे नऊ मंत्री होते. त्यांना शपथविधी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र, ताज्या मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटातून सहा किंवा सात मंत्र्यांनाच शपथविधी दिला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT