Aditya Thackeray Vs Eknath Shinde news Sarkarnama
पुणे

Aditya Thackeray Vs Eknath Shinde: अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री शेती करायला जातात; ठाकरेंनी उडवली खिल्ली

CM Eknath Shinde Works At His Village Farm: घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना वेळ नाही. भाजपची नक्की काय विचारधारा आहे, असा प्रश्न पडत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Chaitanya Machale

Pune News: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र राज्यकर्त्यांकडे वेळ नसल्याने उद्घाटने रखडली आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी चुकीची कामे सुरू आहेत मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी टीका करत 'हे सरकार कंत्राटदारांचे आहे की सर्वसामान्य नागरिकांचे? असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (CM Eknath Shinde Works At His Village Farm)

आदित्य ठाकरे हे रविवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली. मुंबईतून पुण्याकडे येताना दोन उड्डाणपूलांची कामे ही काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेली आहेत. मात्र केवळ मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना वेळ मिळत नसल्याने या उड्डाणपूलांचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे हे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेली नाहीत.

पुणे विमानतळाच्या शेजारी असलेल्या विस्तारित इमारतीचे काम देखील पूर्ण झाले आहे. रुबी हॉल पासून पुढे जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झालेले आहेत, मात्र राज्यकर्त्यांना वेळच मिळत नसल्याने हे प्रकल्प अद्यापही कार्यान्वित झाली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात मोठ्या प्रमाणे ड्रगचा साठा सापडत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याची स्थिती आहे. राजकीय मंडळी गुंडांना भेटून येतात, पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार होतो. महिलांची छेडछाड असे सर्रास प्रकार वाढत आहे, राज्यात सरकार अस्तिवात आहे का नाही हेच कळत नाही. मुख्यमंत्री अमावस्या,पौर्णिमा असे कधीतरी शेती करायला जातात. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना वेळ नाही. भाजपची नक्की काय विचारधारा आहे, असा प्रश्न पडत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दात टीका केली. बावनकुळे यांचा चायनाशी जवळून संबंध आहे. भाजपने लोकशाही संपवली आहे. आजही 30 शहरांमध्ये महापौर नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासनाच्या हातात कारभार गेला आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. निवडणूक आयोगाच्या सूचना असतानाही आणि चार वर्षे पूर्ण झालेली असतानाही अनेक शहरांचे आयुक्त देखील बदलले नाहीत, या मागचं गौडबंगाल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आम्ही भांडत नाही...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात त्याचा निर्णय जाहीर होईल. आम्ही जागा वाटपात मध्ये कोणीही भांडत नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेतल्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जात असल्याचे ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT