Congress Sarkarnama
पुणे

Maharashtra Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? दोन नावं आघाडीवर; पटोलेंवर काय जबाबदारी...

Congress Leadership in Maharashtra: निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पटोलेंनी राजीनामा शस्त्र बाहेर काढले आहे.

Mangesh Mahale

Pune 24 Jan 2024: नाना पटोलेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार ही चर्चा सुरु झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. प्रदेशाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी काही नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडकडे फिल्डिंग लावली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. काँग्रेसच्या या अपयशाचं खापर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी दिल्लीवारी करीत पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पण त्यांनी नक्की राजीनामा दिला की नाही याबाबत साशंकता आहे. पटोलेंनी आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केले होते. पण काँग्रेसकडून याबाबत अद्याप कुणीही थेट बोलणं टाळलं आहे.

अमित देशमुख आणि सतेज पाटील ही दोन नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेस हायकमांडकडून या नावांवर विचारविनिमय सुरु आहे. सतेज पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते.याबाबत येत्या सोमवारी निर्णय होणार आहे. पक्षाकडून अद्याप याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही, पण पक्षाअंतर्गत प्रदेशाध्यक्ष पदावरुन मोठ्या हालचाली सुरु असल्याचे खात्रीलायक माहिती आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पटोलेंनी राजीनामा शस्त्र बाहेर काढले आहे. त्यांचा राजीनामा खरचं स्वीकारला का? नवीन अध्यक्षांच्या घोषणा कधी होईल, अशी विचारणा होत आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला, तर दुसरीकडे महायुतीचा वारु जोरात होता. महायुतीनं २३० जागांवर दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल.

भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT