Devendra Fadnavis, Raj Thackeray, Narendra Jadhav Sarkarnama
पुणे

Hindi Language: हिंदी सक्ती विरोधानंतर सरकारचा मोठा निर्णय; नव्या अभ्यासक्रमात हिंदीला 'ब्रेक'

Maharashtra Drops Third Language From Proposed Curriculum:नवीन अभ्सासक्रमात मराठी, गणित, इंग्रजी गणित, भूगोल, इतिहास आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा दिसत नाही.

Mangesh Mahale

तिसरी -ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहे. नवीन अभ्यासक्रमात हिंदी सक्तीबाबतचा नियम बदलण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा काढून टाकण्यात आली आहे.

तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याचे धोरण एससीईआरटीने काढून टाकलं आहे, नवीन अभ्सासक्रमात मराठी, गणित, इंग्रजी गणित, भूगोल, इतिहास आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा दिसत नाही. हिंदी सक्तीला नुकताच मोठा विरोध झाला, आंदोलन, सभा झाल्या त्यानंतर हा बदल केल्याचे दिसते. नव्या अभ्यासक्रमाबाबत राज्य सरकारच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे म्हणजेएससीईआरटीनं नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला आहे.

राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाला केराची टोपली दाखवली आहे.

एनसीआयटीने तिसरी ते दहावीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातूनही तिसरी भाषा वगळली आहे. नव्या मसुद्यात यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र; तसेच कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचे विषयांचा समावेश आहे.

राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यानंतर विविध संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. याबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीच्या अहवालातील शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.जाधव समितीचे काम सुरु आहे. पण त्याआधी एससीईआरटीने केलेल्या नव्या अभ्यासक्रमात हिंदीला वगळल्यामुळे हिंदी विरोधी आंदोलनाला यश आल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT