Gram Panchayat Election  sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election Results 2022 live : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेचं पानिपत

gram panchayat election results 2022 live : 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल

सरकारनामा ब्युरो

धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यातील तब्बल 32  जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाने मोहोर उमटवली आहे. तर शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला असल्याचे चित्र आहे.  

नंदुरबारमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने आतापर्यंत 18 जागा जिंकल्या आहे. तर शिंदे गटानेही 14 जागा जिंकल्या आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही.

पुणे : 30 ग्रामपंचातीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, शिंदेगटाला रोखण्यास राष्ट्रवादीला यश. दिलीप वळसे पाटील, अतृल बेनकेंनी मारली बाजी

आत्तापर्यत २६२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप १०१, शिंदे गट २४, शिवसेना १४, कॉंग्रेस २२,राष्ट्रवादी ५८, अन्य ४३ उमेदवार विजयी झाले आहेत.

चोपडा तालुका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी 3, शिवसेना 2, शिंदे गट 3, तर ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

grampanchyat Election News

जळगाव जिल्हा

सत्रासेन- वंदना ज्ञानेश्वर भादले, राष्ट्रवादी, बोरमळी/देव्हारी- जुनाबाई किसन पाडवी, शिवसेना, मोहरद- अंजुम रमजान तडवी, शिंदे गट, वैजापूर- दत्तरसिंग सुभाष पावरा, शिंदे गट, कर्जाने- अलका सतीश बारेला, अपक्ष, पिंप्री- वकील शिवाजी इंगळे, शिंदे गट, उमर्टी- रिनेश रमेश पावरा, राष्ट्रवादी, मोरचिडा- हरिश्चंद्र सोनसिंग भादले, राष्ट्रवादी, कृष्णापूर- पिनबाई गेमा बारेला, शिवसेना, बोरअजंटी- शकुंतला धरमसिंग बारेला, अपक्ष, मेलाणे- लालबाई प्रताप पावरा, अपक्ष, परसाडे - मीना राजू तडवी -अपक्ष

जिल्हा - जळगाव

एकुण ग्रामपंचायत- 13

निकाल जाहीर 13

शिवसेना - 03

शिंदे गट - 03

भाजप-

राष्ट्रवादी- 03

काँग्रेस-

अपक्ष -04

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंतचा निकाल, 18 पैकी 14 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात, तीन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं वर्चस्व

पुणे : राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत सुमारे 76 टक्के मतदान झाले.निवडणुकीचे निकाल येण्यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये शिंदे-भाजप गटाने ७६, काँग्रेसने २० तर राष्ट्रवादीने ३१, आघाडीने ६१ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही रविवारी मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT