Maharashtra Karnatak Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) ट्रकवर हिरेबागेवाडी- बेळगाव टोलनाक्याजवळ हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक, शाईफेक केली आहे. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज (6 डिसेंबर) कर्नाटकातील बेळगावला भेट देणार होते. त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी बेळगावला न येण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सीमावाद चिघळू नये, म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा दौरा तूर्त रद्द करण्यात आला. पण त्यानंतर आज कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी आज दगडफेक केली. महाराष्ट्र पासिंगच्या सहा ट्रकवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली.
मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला असतानाही संघटनेच्या लोकांकडून आज रास्ता रोको आंदोलन कऱण्यात आले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कोल्हापूर-कर्नाटक सीमेवर आज मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून कायम जाणीपुर्वक महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार सुरु आहे. पोलिसांचा फौजफाटा असतानाही त्यांच्याकडून वाहनांवर हल्ला होत असेल तर त्यांना कोणी फुस लावतय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. आम्ही संयम ठेऊन आहोत म्हणजे आम्ही हतबल नाही. देशात उभी फुट पाडणे योग्य नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आक्रमक नाही, असं कोणी समजू नये, असा इशाराच मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.