Lok Sabha Election 2024 Voting LIVE Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: प्रत्येक मत महत्त्वाचं; शरद पवारांनी मुंबईऐवजी माळेगावात बजावला मतदानाचा हक्क

कल्याण पाचांगणे : सरकारनामा

Baramati News: बारामतीत (Baramati Lok Sabha Election 2024 Voting) प्रत्येक मताची गोळाबेरीज केली जात आहे. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपले मतदान बारामतीला स्थलांतरित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच मुंबईऐवजी बारामती तालुक्यातील माळेगावात मतदानाचा हक्क बजावला. पवार हे 2019 पर्यंत शरद पवार हे मुंबईत मतदान करीत होते. पवार हे बारामतीच्या बाहेर मतदान करतात, अशी टीका विरोधक नेहमीच करीत होते.

माळेगाव (ता.बारामती) येथील एसएसएम हायस्कूलमधील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे उपस्थित होते. सुप्रिया सुळे, त्यांची कन्या रेवती सुळे यांनी रिमांड होम मतदान केंद्रात मतदान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.अजित पवार यांची आई आशाताई यांनीही काटेवाडीत मतदानाचा अधिकार बजावला.

यंदा शरद पवार त्यांनी आपले नाव मुंबईतून कमी करून घेत बारामती विधानसभा क्षेत्रात माळेगाव येथील गोविंदबागेच्या पत्त्यावर नोंदवले आहे. बारामतीत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. संपुर्ण पवार कुटुंबिय मतदानासाठी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत.

बारामती मतदारसंघात एकूण २३ लाख ६२ हजार ४०७ मतदार; तर दोन हजार ५१६ मतदान केंद्रे आहेत.मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. वयोवृद्ध मतदारांचे केंद्रावर फूल देऊन स्वागत केले जात आहे.अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदसंघासाठी मतदान सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT