Onion  sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : कांद्याने डोळ्यात पाणी आणले, येणारे आतातरी सत्ताधारी बोध घेतील का?

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा मुद्दा चर्चेत राहिला. विरोधकांनी या मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसल्याचा पहिला मिळाला. आता नवे सरकार स्थापन होईल. या नव्या सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत. त्यामुळे कांद्याने डोळ्यात पाणी आणले, येणारे आतातरी सत्ताधारी बोध घेतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

केंद्र सरकारने मागील सहा महिन्याच्या काळात कांदा उत्पादक चांगलीच कोंडी केली. निर्यातबंदी, निर्यात शुल्क निर्यात मूल्य यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकावा लागला. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष वाढून त्यांचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले. 

खरे तर निवडणुकीत भाजपला यापूर्वी देखील अनेकदा कांद्याने चांगलाच दणका दिला आहे. पण त्यावेळी कांदा महाग झाल्याने ग्राहकांनी तो दणका दिला होता. पण आता कांद्याचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांनी हा  दणका दिला. दिंडोरी, नाशिक, नगर, शिरूर, शिर्डी आणि धाराशिव या कांदा उत्पादक पट्ट्यात सत्तधारी भाजपला हा दणका बसला आहे. आता यातून धडा घेऊन नवे सरकार कांद्याविषयीचे धोरण बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या भाजपच्या नव्या सरकारला शेतीमाल धोरणात काही बदल करावे लागणार आहेत. त्याबाबत  शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत.  कापूस आणि खाद्यतेल आयात निर्यातीचे धोरण, कांदा निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य काढण्याची मागणी करण्यात येत  आहे. तर आपल्या देशाच्या अपरिहार्यतेमुळे सरकारला काही निर्णय घ्याव लागण्याची शक्यता आहे. त्यात गहू आयात, तांदूळ आणि साखर निर्यात याबाबत सरकारचे धोरण बदलेल, अशी शक्यता बाजारातून व्यक्त केली जात आहे.

देशात सध्या कापसाचे भाव ही कमी आहेत. यंदा दुष्काळामुळे कापूस उत्पादकांना फटका बसला. त्यातच भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पडल्याने आयात शुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर यंदा शेतकऱ्यांनी कापूस विकल्यामुळे तेवढा फटका बसणार नाही. पण नव्या हंगामात याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT