ncp news update
ncp news update sarkarnama
पुणे

NCP : महाराष्ट्र को क्या मिला ? ; लॉलीपॉप लॉलीपॉप.. : पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

सरकारनामा ब्युरो

पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (vedant project)गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या (maharashtra) विरोधात आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp)निदर्शने सुरु आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे दिले आश्वासन दिले आहे. "पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन सुरु आहे.

"महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप," अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत.

वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवला आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. रिफायनरी प्रकल्प करणारी कंपनी आरआरपीसीएल राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्याची तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प हा २०१८ पासून रखडलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT