Malegaon Political News : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी कारखान्याचा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले परंपरागत विरोधक असलेल्या साखर संघाचे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
छत्रपती कारखान्याबाबत अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांचे पडसाद आता माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उमटण्यास सुरवात झाली आहे. माळेगावचे दोन्ही बाजूचे इच्छुक नेतासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ही मंडळी गांगारून गेल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्यात पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने जी तडजोडीची भूमिका घेतली, तशीच भूमिका ते माळेगाव कारखान्यात घेतील का ? पवार आणि त्यांचे पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात मनोमिल झाले तर आपल्या उमेदवारीचे काय ? असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
छत्रपती कारखान्यातील अजितदादाचे कट्टर विरोधक ज्येष्ठ नेते पृथ्वीराज जाचक यांच्याशी जडजोड करीत अजितदादांनी सर्व पक्षीय मेळाव्याला रविवारी हजेरी लावली. तेच चित्र माळेगावमध्ये अजित पवार आणि पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात मनोमिल झाले तर आपल्या उमेदवारीचे काय ? हा विचाराने माळेगावची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले दोन्ही बाजूचे नेते मंडळींना टेन्शन आले आहे. यावर सगळ्यांनी मौन धारण केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती (ता.इंदापूर), माळेगाव आणि सोमेश्वर (ता.बारामती) सहकारी साखर कारखाने हे कार्यरत आहेत. सध्याला छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे, तर माळेगावचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना निवडणूक प्राधिकरण विभागाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निवडणूकीते वारे वेगाने वाहू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारीतील राजकारण पेटलं आहे.
'माळेगाव'बाबत रंजन तावरे यांनी मात्र सध्यातरी तडजोडीवर चर्चा नाही. आमची बांधीलकी शेतकऱ्यांशी आणि ऊस दराशी आहे,' अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "माळेगावच्या शेतकर्यांच्या न्यायासाठी आम्ही २८ वर्षांपासून संघर्ष करीत आहे.
अर्थात माझ्या आगोदरपासून आमचे मार्गदर्शक चंद्रराव तावरे हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. आम्हीही सत्तेत असताना विक्रमी असा ऊस दर दिला आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या राजकारणात आम्ही तडजोड कशासाठी कराय़ची," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"अजितदादा निवडणूकीबाबत जो निर्णय घेतील, त्याला सत्ताधारी संचालक मंडळ पाठिंबा देईल. राहिला प्रश्न इच्छुकांच्या उमेदवारीचा शेवटी आपल्या नेत्याने कोणताही निर्णय घेतला, तरी त्या विचाराशी बांधील राहून राजकारणात काम करायचे असते," अशा शब्दात संचालक अनिल तावरे, योगेश जगताप यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.