Malegaon Sugar Factory AJIT PAWAR (1).jpg Sarkarnama
पुणे

Malegaon Sugar Factory Election: माळेगाव निवडणुकीचा सस्पेन्स वाढला, अजितदादा उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार?

Ajit Pawar News: माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना यंदाच्या पंच वार्षिक निवडणूकीत 593 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 29 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी (ता.11) अखेर मागे घेतले.

कल्याण पाचांगणे

Pune News : छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगणार आहे. बारामतीच्या राजकारणात महत्वाची ठरणाऱ्या माळेगावच्या निवडणुकीसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटलं आहे. माळेगाव कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

माळेगाव कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा उद्या गुरूवारी (ता.१२) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणूक रिंगणात पवार कायम राहतात, की माघात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाची भूमिकाही स्पष्ट होणार आहे. या प्रक्रियेत सत्ताधारी विरुद्ध पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यात तडजोड होते की फाटी आखून लढत होते, हा त्यांच्यातील खरा लढाऊ बाणा पहावयास मिळणार आहे.

माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना (Malegaon Sugar Factory Election) यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकीत 593 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 29 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी (ता.11) अखेर मागे घेतले. विशेषतः उर्वरित उमेदवारी अर्जांत अजित पवार यांचा ब वर्ग संस्था मतदारसंघातून अर्ज अद्याप कायम आहे.

या मतदारसंघातून मात्र 13 इच्छुकांनी आपले अर्ज आजवर मागे घेतले. उद्या गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत किती पॅनेल रणांगणात उतरतात, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, ब वर्ग संस्था मतदार संघातील 13 इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये दत्तात्रेय गवारे, अशोक जगताप, प्रकाश तावरे, बाळासाहेब तावरे, विरेंद्र तावरे, सतिश तावरे, शरदचंद्र तुपे, उदयसिंह देवकाते, यशवंत देवकाते, कुंडलिक शिर्के, अजित जगताप, केशवराव जगताप, संजय निकम इत्यादींची नावे कमी झाली. माळेगाव गटातून विश्वनाथ बुरूंगले, भालचंद्र येळे यांनी अर्ज मागे घेतले. पणदरे गटातून नितीन मुळीक व विलास जगताप या दोघांचा अर्ज मागे घेतला.

खांडज-शिरवली गटातून प्रतापसिंह पवार, बापू पडर, तर नीरावागजमधून यशवंत देवकाते व शंकर झिटे यांचा अर्ज मागे घेण्यामध्ये समावेश आहे. बारामती गटातून अमर घाडगे व संतोष गावडे यांनी अर्ज मागे घेतले. महिला राखीव मधून तीन उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये चैत्राली गावडे, सुलाबाई वायाळ, विद्या येळे यांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त जाती व जमातीमधून बाळकृष्ण वायाळ व भालचंद्र येळे यांनी अर्ज मागे घेतले. इतर मागास प्रवर्गातून नंदकुमार खुंटाळेंचा अर्ज मागे आला.

उद्या गुरुवारी (ता.12 जून) अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. तसेच संबंधित उमेदवारांना शुक्रवारी 13 जून रोजी चिन्हे वाटप होणार आहे. त्यानुसार मतदान रविवार (ता.22 जून) रोजी होणार आहे, तर मतमोजणी बुधवारी (ता.24 जून) रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT