पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या सेवेत असलेल्या भाडेतत्वावरील ठेकेदरांच्या बस ‘लॉकडाऊन’च्या काळात बंद होत्या.मात्र, त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना तब्बल ९१ कोटी रूपये देण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’च्या (PMPML) संचालक मंडळाने घेतला आहे.हा निर्णय म्हणजे पुणेकरांच्या खिशावर दरोडा घालून ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रकार असल्याची टीका करण्यात येऊ लागली आहे.
‘आपले पुणे’ या संस्थेच्यावतीने या निर्णयास आक्षेप घेण्यात आला आहे.हा निर्णय अडचणीत असलेल्या ‘पीएमपीएमएल’ला आणखी अडचणीत आणणारा आहे, असे मत संस्थेचे पदाधिकारी व पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी व्यक्त केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात शहरातील अनेक व्यक्ती व संस्था अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे कराराचा भाग म्हणून ठेकेदारांना अशाप्रकारे मदत करणे योग्य नसल्याचे केसकर यांनी म्हटले आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करून या संबंधातील सर्व कागदपत्रे पुणेकरांच्या माहितीसाठी खुली करावीत अशी मागणी केसकर यांनी केली आहे.
हा निर्णय आंमलात आणणे म्हणजे पुणेकरांच्या आणि ‘पीएमपीएमल’च्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा घातल्यासारखे होईल, असे केसकर यांनी म्हटले आहे.कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये पुण्यातील ‘पीएमपीएमएल’ची बससेवा दीर्घकाळ बंद होती. या काळात ठेकेदारांच्या बसदेखील बंद होत्या. ठेकेदारांशी झालेला करार व न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे लवादाप्रमाणे ठेकेदारांना नुकसान भरपाई द्यावी, लागणार असल्याने ९१ कोटी रूपये द्यायचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘पीएमपीएमएल’च्यावतीने सांगण्यात येत आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.