Manchar Nagar Panchayat result, Sarkarnama
पुणे

Manchar Nagar Panchayat Result : वळसे पाटील, आढळराव पाटलांचा गड आला पण सिंह गेला... एकनाथ शिंदेंच्या सभेने नगराध्यक्षपदाची गणित बदलली

Manchar Nagar Panchayat result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढतीत शिवसेनाच्या राजश्री दत्ता गांजाळे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडणूक आले आहेत.

डी के वळसे पाटील

Manchar (Pune): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचर येथे झालेली प्रचाराची जाहीर सभा शिवसेनेला अनुकूल ठरली आहे.पण त्यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष झाला असला तरी त्यांना पुरेसे बहुमत मिळविता आले नाही. राष्टवादी कॉंग्रेस पक्ष व भाजपची युती झाली.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्राची आकाश थोरात(अपक्ष) यांना मिळालेली मते लक्षणीय होती. त्यांनी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेशी दिलेली कडवी झुंज दोन्ही पक्षांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आघाडीच्या उमेदवार रजनीगंधा राजाराम बाणखेले यांना ७३८ मते मिळाली.

काँग्रेसच्या फार्जीन इकबाल मुलाणी यांना ३३३ व अपक्ष जागृती किरण महाजन यांना ३०१ मते मिळाली. दरम्यान नगराध्यक्षपदी राजश्री गांजाळे विजयी झाल्या असल्या तरी त्यांचे पती दत्ता गांजाळे यांचा पराभव झाला आहे. त्यांना १३५ मते मिळाली. गड आला पण सिंह गेला अशी अवस्था शिवसेनेची त्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पण नगराध्यक्षपद त्यांच्या हातातून गेले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था थोडी खुशी थोडा गम अशी झाली आहे.

नगराध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीची झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार राजश्री दत्ता गांजाळे विजयी झाल्या आहेत . त्यांना ४ हजार १३५ मते मिळाली आहेत. त्यांच्या निकटवर्तीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका सुनील बाणखेले यांना ३ हजार ९२५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांना ३ हजार २२४ मते मिळाली आहेत. एकूण १७ नगरसेवकांच्या जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ९, शिवसेना ४ , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक, अपक्ष दोन उमेदवार निवडून आले आहेत. फटाके, गुलाल व भांडाराची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे.

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा ,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपचे नेते डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे यांनी प्रचारसभा व जनसंपर्क मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली . पण त्यांचे नगराध्यक्षपद हुकले. राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा जिंकल्या आहेत. निवडून आलेले तीन पैकी दोन अपक्ष उमेदवार पूर्व अश्रामिचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद बहुमत दिसणार आहे. भाजपला खाते उघडता आले नाही. ज्योती संदीप बाणखेले (भाजप) व लक्ष्मण पारधी (शिवसेना) यांना दोघानाही प्रत्येकी २२३ मते मिळाली. चिठ्ठीत पारधी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

विजयी उमेदवारांची नावे व पक्ष कंसात

वार्ड क्रमांक एक - वंदना कैलास बाणखेले (राष्ट्रवादी काँग्रेस) बिनविरोध,वार्ड क्रमांक दोन -उर्मिला प्रवीण मोरडे (राष्ट्रवादी काँग्रेस),वार्ड क्रमांक तीन- लक्ष्मण पारधी (शिवसेना),वार्ड क्रमांक चार -विकास जाधव (शिवसेना), वार्ड क्रमांक पाच- संदीप थोरात (राष्ट्रवादी), वार्ड क्रमांक सहा- रविकिरण दिनकर आवळे (अपक्ष) वार्ड क्रमांक सात - शिवाजी राजगुरू (अपक्ष), वार्ड क्रमांक आठ- इमरान अली (राष्ट्रवादी काँग्रेस), वार्ड क्रमांक ९- शेख अंशरा अल्ताफ (शिवसेना),वार्ड क्रमांक १०- वसंत विष्णू बाणखेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), वार्ड क्रमांक ११-धनेश मोरडे( राष्ट्रवादी काँग्रेस)

वार्ड क्रमांक १२-मालती जितेंद्र थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस),वार्ड क्रमांक १३- अंजली निलेश बाणखेले (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस),वार्ड क्रमांक १४- डॉ. सोनाली विकास बाणखेले (अपक्ष), वार्ड क्रमांक १५- माणिक संतोष गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस), वार्ड क्रमांक १६- पल्लवी निलेश गांजाळे (राष्ट्रवादी काँग्रेस), वार्ड क्रमांक १७-बेबी दौलत थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नऊ, शिवसेना चार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक, अपक्ष दोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT