Mangaldas Bandal Sarkarnama
पुणे

बांदलांच्या जवळच्या नातेवाईकाला भोसले बॅंक गैरव्यवहारप्रकरणी अटक

राहुल टाकळकर हा मंगळवारी (ता. ८ डिसेंबर) मध्यरात्री राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ कोटी ८५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांतील फरारी आरोपी राहुल वसंत टाकळकर याला त्याच्या घराजवळून शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. (Mangaldas Bandal's close relative arrested in Bhosle bank fraud case)

राहूल टाकळकर हा याच गुन्ह्यामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांचा जवळचा नातेवाईक आहे. त्याला शिरूरच्या न्यायालयाने ता. ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) झालेल्या सुनावणीत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती फौजदार अमोल खटावकर यांनी दिली.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचे एकुण चार गुन्हे शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यातील भोसले बॅंक आणि मंदार पवार यांच्या फिर्यादीनुसार राहुल वसंत टाकळकर याच्यावर दोन प्रकरणांत सहभाग असल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे राहुल टाकळकर याच्यावर शिक्रापूर पोलिस लक्ष ठेवून होते.

दरम्यान, टाकळकर हा तब्बल आठ महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्या टाकळकर याला मंगळवारी (ता. ८ डिसेंबर) मध्यरात्री राहते घरी (हिवरे कुंभार, ता. शिरूर) येथे येणार असल्याची माहिती मिळताच फौजदार अमोल खटावकर, पोलिस नाईक अतुल पखाले, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, अमोल दांडगे, किशोर शिवनकर यांच्या पथकाने त्याला हिवरे येथून अटक केली. त्याला शिरूर न्यायालयात दाखल करताच एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला गुरुवारी (ता.९ डिसेंबर) पुन्हा शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती फौजदार अमोल खटावकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT