Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange : उमेदवार पाडायचं की उभं करायचं 29 ऑगस्टला ठरविणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maratha Reservation News : मराठा समाजात खूप उमेदवार आहेत. माझ्या गाडीत सहा उमेदवार आहेत. सर्वांनी उभा करणाऱ्याला निवडून आणा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

(सागर आव्हाड)

Pune News : मराठा आरक्षणासाठी एक वर्ष झाले आमचा लढा सुरू आहे. संयमाने सुरू आहे. किती दिवस अन्याय सहन करायचा? असा सवाल करीत 29 ऑगस्टला उमेदवार पाडायचं किंवा उभं करायचं ठरवले जाणार आहे. मराठा समाजात खूप उमेदवार आहेत. माझ्या गाडीत सहा उमेदवार आहेत, जात मोठी करण्यासाठी आपल्याला राजकारणात जायचे आहे. इच्छुक असू द्या..पण स्वार्थासाठी नाही तर जातीसाठी काम करायचे आहे. सर्वांनी उभा करणाऱ्याला निवडून आणा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी पुण्यातील शांतता रॅलीप्रसंगी केले.

या निवडणुकीत बाकीचे कोणी उभा राहल्यास तो राजकारणासाठी सोबत होता अस समजा. बीड जिल्ह्यात ही अशीच म्हणतायत, यांना पाडा, मुस्लिम समाज तर आपल्या पुढे आहेत. बारा बलुतेदार सोबत आले तर यांचा कार्यक्रम ठरला. मराठा समाजाने 100 टक्के मतदान करा, असे आवाहन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केले. (Manoj Jarange News)

राजकारणी हे खूप हुशार आहेत. तीर्थ यात्रेला नागरिकांना घेऊन जातात. तोपर्यंत आपलं सीट पडतं, यावेळी सर्वांनी मतदान झाल्याशिवाय जाऊ देऊ नका. विरोधकांसोबत राहा, पण त्याला पाडा. मराठे नेते सर्व व्यासपिठावर होते तरी ते पडले. मराठा हा पैशांसाठी काम करत नाही. पाडायचं ठरलं तर नाव सांगू का.....अनेकांना त्यांनी पाडले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत 19 ठिकाणी केले सर्वेक्षण

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणतायत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही, त्यांच्या मतदार संघात 1 लाखापेक्षा अधिक मतदान आहे. परळीत तर येतच नाही.. येऊच देणार नाही. त्यांनी खूप त्रास दिला, मी बदला घेणार आहे. कोकण, विदर्भ, खानदेश येथील सर्व उमेदवार पडणार आहे. मुंबईत उमेदवार पाडणे आणि उभा करणं अवघड आहे. पण,19 ठिकाणी आपले सर्वेक्षण केले आहे. मला जिवंत मारलं तरी ओबीसींमधून आरक्षण घेणारच...समाजची मान खाली होऊ देणार नाही. समाजाशी गद्दारी करणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

एक इंच ही मागे सरकणार नाही

मुख्यमंत्र्यांना मागणी करतोय, EWSच आरक्षण पुन्हा परत द्या. तुम्हाला आमच्या मुलांच वाटोळे करण्याचा अधिकार नाही. अन्यथा तुमच सरकार पडणार. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, सरसकट गुन्हे मागे घ्या, मराठ्यांची पोट जात ही कुणबी म्हणून जाहीर करा, अन्यथा हे सरकार पडणार आहे. पाडायचे की उभे करायचं हे 29 ऑगस्टला ठरणार आहे, एक इंच ही मागे सरकणार नाही. या सरकार आणखी एक संधी आहे. या मागण्या पूर्ण न केल्यास हेच मराठे एक ही उमेदवार निवडून येऊ देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला

फडणवीस यांचे सर्व षड्यंत्र तोडण्याची ताकद माझ्याकडे

देवेंद्र फडणवीस यांची सर्व षड्यंत्र तोडण्याची ताकद माझ्यात आहेत. सर्व षड्यंत्र हाणून पाडले आहेत. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन मी आरक्षण मिळवणार आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत. ओबीसी आणि मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नका. जगात मी नसलो तर मराठा समाज फुटू देऊ नका. शेवटी हे शरीर आहे. माझे सर्व अवयवदान केले आहेत. निवडणुकीच्या काळात गोड बोलतील, भावनिक होऊ नका, असे आवाहनही त्यांनी समाज बांधवाना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT