पुणे

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, कोथरुडमध्ये तणाव

सरकारनामा ब्युरो

पुणे: मराठा आंदोलनासंबंधी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्या व्हायरल वक्‍तव्यावरुन आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज कोथरुड येथील कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. 

काल मराठा आंदोलकांनी भाजप मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला कुलकर्णी यांनी स्टंटबाजी म्हटल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले. प्रत्यक्षात कुलकर्णी यांनी असे बोलले नसल्याचे म्हटले आहे. 

कालच्या या घटनेनंतर आज आक्रमक झालेल्या 200 आंदोलकांनी कुलकर्णीचे घर गाठले. त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT