Hemant Rasane Election Campaign 
पुणे

Maratha Reservation : ठाकरे सरकारने मराठा आरक्षण घालवले : मराठा महासंघ

Hemant Rasane Election Campaign : मराठा समाज हेमंत रासनेंच्या पाठीशी; मराठा महासंघाच्या उपाध्यक्षांचा विश्वास

सरकारनामा ब्युरो

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळाले, युती सरकारने ते आधी हायकोर्टात आणि त्यानंतर सरकारमध्ये असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात टिकविले, मात्र उद्धव ठाकरे सरकारने ते घालविले त्यामुळे मराठा समाज भाजप महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे यांनी व्यक्त केला.

रासने यांना पाठींबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संतोष नानवटे, अनिल ताडगे, दुष्यंतराजे जगताप, मयूर गुजर, राजेश केदारी, नरेंद्र मोहिते, अमित साळुंखे, विनायक मिसाळ, वनिता जगताप, जगदीश गाडेकर, राहुल पवार, शेखर तूपसुंदर, विकास जाधव, इंद्रजीत शिंदे, गहिनीनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते टिकविण्याची आमची जबाबदारी आमची आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महायुतीने पुनरुज्जीवन करुन 1 लाखांहून अधिक उद्योजकांना 8320 कोटींचे कर्ज वितरण केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत आर्थिक मागास 17 लाख 55 हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9 हजार 262 कोटी रुपये मंजूर केले. सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेतून यूपीएससीत 51 विद्यार्थी यशस्वी एमपीएससीत 480 विद्यार्थी यशस्वी झाले. सारथीमार्फत 80 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. सारथी कार्यालयासाठी आठ विभागात सरकारने जमिनी दिल्या, असेही रासने म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT